लम्पी व्हायरसने आजारी असलेल्या गायीचं दूध पिणं सुरक्षित आहे का, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

लम्पी (Lumpy skin disease) हा एक त्वचारोग असून विशेषतः दुग्धजन्य प्राण्यांमध्ये आढळून येणारा संसर्गजन्य आजार आहे. लम्पि रोग नावाचा हा आजार गुजरात, राजस्थान, यूपी, पंजाब आणि हरियाणासह आता महाराष्ट्रात देखील या वायरसने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार लम्पि हा रोग महाराष्ट्रात आतापर्यंत 22 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. 

लम्पी (Lumpy skin disease) हा जनावरांमध्ये दिसून येणारा त्वचारोग आहे. हा व्हायरस नवीन असल्यामुळे सध्या त्यावर प्रभावी असा औषध उपचार उपलब्ध नाही. लम्पि हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे त्याचे संक्रमण अधिक जलद गतीने होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्ह्यामधील जनावरांचा बाजार देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच दुग्धजन्य प्राण्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

लम्पी व्हायरसने आजारी असलेल्या गायीचं दूध पिणं सुरक्षित आहे का?

Can we drink milk of lumpy virus cowलम्पी स्किन डिसीज (LSD) या व्हायरस ने संक्रमित दुग्धजन्य प्राण्यांचे दुधाचे सेवन करणे सुरक्षित आहे. कारण संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरत नाही. इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (आयव्हीआरआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

कोणत्याही प्रकारचे दूध हे उकळून च त्याचे सेवन करावे असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतेही दूध हे उकळून च त्याचे सेवन करावे.

लम्पि हा व्हायरस नवीन असल्यामुळे सध्या सर्व नागरिकांनी याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दुग्धजन्य जनावरे असतील, त्यांनी अशा जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांची स्वच्छता, लसीकरण बूस्टर डोस , आदि औषधोपचार करून घ्यायला हवेत.

लम्पी व्हायरस चा मानवाला धोका आहे का?


लम्पी रोग हा नविन प्रकारचा जनांवरामधील आजार असल्यामुळे त्याचा मानवाला धोका नाही. अद्यापपर्यंत एकही रुग्ण मानवामध्ये आढळलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय पशुसंवर्धन विभागाच्या वेळोवेळी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

दुग्धजन्य प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यास आपण वैयक्तिक स्वच्छता काळजी घ्यायला हवी, जसे हात धुणे, मास्क वापरणे इ. तसेच दुग्धजन्य प्राण्यांचे दूध हे उकळूनच आपण त्याचे सेवन करायला हवेत.


लम्पी रोग महाराष्ट्र राज्यातील सद्यस्थिती


लम्पि या आजाराने आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये एन्ट्री केलेली असून, या जिल्ह्यातील 338 गावांमधील 2664 जनावरांमध्ये हा रोग आढळून आला आहे. आतापर्यंत 5 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease)  संबंधित पडणारे सर्वसामान्य प्रश्न 


प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज आजाराचा मनुष्याला धोका आहे का?

उत्तर- नाही. आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती म्हणाले की, लम्पि हा वायरस चा संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये होत नाही. अजूनपर्यंत तशी एकही केस बघायला मिळालेली नाही.

प्रश्न- लम्पी व्हायरसने आजारी असलेल्या गायीचं दूध पिणं सुरक्षित आहे का?

उत्तर- होय. लम्पी स्किन डिसीज (LSD) या व्हायरस ने संक्रमित दुग्धजन्य प्राण्यांचे दुधाचे सेवन करणे सुरक्षित आहे. कारण संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरत नाही. कोणत्याही प्रकारचे दूध हे उकळून च त्याचे सेवन करावे असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.

प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग कशामुळे होतो?

उत्तर- लम्पी हा एक वायरस असून, हा आजार संसर्गजन्य आहे. डांस , माश्या, गोचीड इतर कीटक तसेच दूषित अन्न-पाणी आणि हवेतूनही हा आजार पसरतो. संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होतो.

प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग किती काळ राहतो?

उत्तर- लम्पी या आजाराची लागण झाल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवस या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येते.

प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग कसा ओळखावा?

उत्तर- लम्पी हा स्कीन त्वचा रोग आहे. जनावरांच्या त्वचेवर पुरळ किंवा १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. जनावरे चारा पाणी घेणे बंद करतात. तसेच तोंडातून लाळ येणे. या लक्षणावरून लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग ओळखता येतो.Post a Comment (0)
Previous Post Next Post