सावधान! लम्पी स्किन रोग काय आहे, माणसांना हा आजार होऊ शकतो?


{tocify} $title={Table of Contents}


लम्पी स्किन रोग काय आहे? | What is lumpy skin disease meaning?

lumpy skin disease in marathi



लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) हा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्यामध्ये जनावरांना खूप जास्त प्रमाणात ताप असतो. तसेच जनावरांच्या सर्व अंगावर (त्वचेवर) पुरळ किंवा गाठी होणे , लाळ गळणे, डोळ्यातून पाणी येणे, चारा-पाणी न घेणे, दूध कमी निघणे यासारखी लक्षणे दिसून येतात. संक्रमित डास, माश्या, उवा आणि इतर कीटकांशी थेट संपर्क साधून हा रोग पसरतो. दूषित अन्न-पाणी आणि हवेतूनही हा आजार पसरतो.

लम्पी ने संक्रमित प्राण्यांपासून दुधाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबद्दल, आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती म्हणाले की, लम्पि हा वायरस चा संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये होत नाही. अजूनपर्यंत तशी एकही केस बघायला मिळालेली नाही.

लम्पी स्किन डिसीज (LSD) हा एक जनावरांमध्ये दिसून येणारा त्वचारोग आहे. लम्पी हा एक नविन वायरस असून त्याचा संसर्ग खूप झपाट्याने होत आहे. लम्पी हा एक संसर्गजन्य आजार आहे. राजस्थान, पंजाब, युपी या राज्यात मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले असून, आता हा रोग महाराष्टात देखील त्याने शिरकाव केला आहे. 

आतापर्यंत जवळपास 22 जिल्ह्यामध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. याबाबतीत पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगली असून, जनावरांच्या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये विशेषतः जनावरांचा बाजार बंद केला असून, ने-आण देखील बंद केली आहे.

लम्पी हा रोग कसा पसरतो? | How is lumpy disease spread?


लम्पी हा एक वायरस असून तो डास, गोचीड, माश्या इतर कीटक किंवा संक्रमित जनावरांच्या संपर्कात जर इतर जनावरे आली तर त्यांच्या द्वारे लम्पी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा प्रसार होतो.

लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) त्वचा रोगाची लक्षणे | Lumpy skin disease symptoms in marathi

लम्पी हा रोग विशेषतः दुग्धजन्य प्राण्यांमध्ये गाई, म्हैस या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मात्र याचा इतर जनावरांना देखील धोका आहे. लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) संक्रमित जनावरांमधील लक्षणे
  • जनावरांमध्ये ताप हा खूप जास्त असतो.
  • जनावरे चारा खाणे व पाणी पिणे बंद करतात.
  • नाकातून व डोळ्यातून सतत पाणी वाहते.
  • जनावरांच्या अंगावर जवळपास 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
  • या आजाराची तीव्रता वाढल्यानंतर गाठी मध्ये पु होतो. पायाला , खुराणा सूज येते.

लम्पी स्किन डिसीज (LSD) रोग होऊ नये व झाल्यास कोणते उपचार करावे? | Lumpy skin disease treatment

  • जनावरांना खरेदी-विक्री बाजारात घेऊन जाऊ नये.
  • गावातील किंवा आजूबाजूच्या जनावरांपासून इतर जनावरे दूर ठेवावे
  • सायंकाळी जनावरांच्या गोठ्यात धूर करावा. त्यामध्ये कडुनिंबाच्या पानांचा वापर करावा. त्यामुळे डांस इतर किटक यापासून जनावरांचे सरंक्षण होईल.
  • जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा.
  • जनावरांच्या गोठ्यात कीटकनाशकांची (फार्मलिन, सोडियम, हायपोक्लोराईट, फिनाइल) फवारणी करून घ्या.
  • जनावरांकडे विशेष लक्ष देऊन या काळात विशेष पौष्टिक आहार जनावरांना द्यावा.
  • आयुर्वेदिक उपचार- नागीलीची पाने, काळी मीरी, मीठाचे मिश्रण करून गुळातून दिवसातून दोनदा आठ दिवस पाजावे.
  • जनावरांना पशुवैद्यकीय डॉक्टर कडून बूस्टर लसीकरण करून घ्यावे.
  • संक्रमित जनावरांना इतर जनावरांपासून अलग करावे.
  • पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावा.

लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease)  संबंधित पडणारे सर्वसामान्य प्रश्न 


प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज आजाराचा मनुष्याला धोका आहे का?

उत्तर- नाही. आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती म्हणाले की, लम्पि हा वायरस चा संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये होत नाही. अजूनपर्यंत तशी एकही केस बघायला मिळालेली नाही.

प्रश्न- लम्पी व्हायरसने आजारी असलेल्या गायीचं दूध पिणं सुरक्षित आहे का?

उत्तर- होय. लम्पी स्किन डिसीज (LSD) या व्हायरस ने संक्रमित दुग्धजन्य प्राण्यांचे दुधाचे सेवन करणे सुरक्षित आहे. कारण संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरत नाही. कोणत्याही प्रकारचे दूध हे उकळून च त्याचे सेवन करावे असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.

प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग कशामुळे होतो?

उत्तर- लम्पी हा एक वायरस असून, हा आजार संसर्गजन्य आहे. डांस , माश्या, गोचीड इतर कीटक तसेच दूषित अन्न-पाणी आणि हवेतूनही हा आजार पसरतो. संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होतो.

प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग किती काळ राहतो?

उत्तर- लम्पी या आजाराची लागण झाल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवस या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येते.

प्रश्न- लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग कसा ओळखावा?

उत्तर- लम्पी हा स्कीन त्वचा रोग आहे. जनावरांच्या त्वचेवर पुरळ किंवा १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. जनावरे चारा पाणी घेणे बंद करतात. तसेच तोंडातून लाळ येणे. या लक्षणावरून लम्पी स्कीन डिसीज हा त्वचा रोग ओळखता येतो.



Post a Comment (0)
Previous Post Next Post