इंस्पायर अवार्ड : महाराष्ट्रातील साताऱ्याच्या यशचे सुवर्ण यश | Inspire Award Winner 2022

भारत सरकारने 2009 पासून विज्ञान आणि तंत्रज्ञान इन्स्पायर अवार्ड  योजनेची सुरुवात केली आहे. इयत्ता 6 वी , ७ वी , ८ वी, ९ वी  व १० वी मध्ये शिकणार्‍या शालेय विद्यार्थ्यांसाठी वयोगट 10 ते 15 वर्ष असणाऱ्या मुलांसाठी INSPIRE Awards ही स्पर्धा आयोजित केली जाते. 

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, सर्जनशील/नवीन विचार रुजवण्याच्या  उद्देशाने केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत इंस्पायर अवार्ड या पुरस्कारासाठी INSPIRE Awards- MANAK ही योजना आहे.

इंस्पायर पुरस्कारासाठी (INSPIRE Awards 2022) महाराष्ट्र राज्यातील 31 बालवैज्ञानिकांची आणि त्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली होती.


{tocify} $title={Table of Contents}


इंस्पायर अवार्ड : महाराष्ट्रातील साताऱ्याच्या यशचे सुवर्ण यश | Inspire Award Winner 2022

Inspire Award Winner 2022


9 व्या इन्स्पायर पुरस्कारासाठी संपूर्ण देशभरातून 6 लाख 53 हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि प्रयोगाची मांडणी केली होती. त्यापैकी 556 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आणि त्यात महाराष्ट्र राज्यातील 31 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामध्ये अंतिम 60 विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील 9 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

या 9 विद्यार्थ्याचा अंतिम फेरीत सन्मान करण्यात आला असून, सातारा जिल्ह्यातील यश शिंदे याने MultipurposeCatering Equipment या विषयावर Project बनवला होता त्यामध्ये त्याने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्रातील साताऱ्याच्या यशचे हे सुवर्ण यश आहे. राज्याचे मा. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.


महाराष्ट्र राज्यातील इंस्पायर पुरस्कार 2022 (INSPIRE Awards 2022) विजेते विद्यार्थी

महाराष्ट्र राज्यातील इंस्पायर पुरस्कार 2022 (INSPIRE Awards) अंतिम फेरीतील सन्मान करण्यात आलेले 9 विद्यार्थी (नाव-जिल्हा-विषय) खालीलप्रमाणे

  1. यश ज्ञानेश्वर शिंदे - सुवर्णपदक विजेता (सातारा) - Multipurpose
  2. Catering Equipment
  3. यश जालिंदर चौगुले (कोल्हापूर) - Date Seed Extractor
  4. अनुष्का अनिल कांबळे (कोल्हापूर) - Sugarcane Lifter
  5. साधना सदीप भिलावडे (सांगली) - Safety Bullock Cart
  6. रिया राजकुमार गायकवाड (पुणे)  - Convertible Commode
  7. दुर्वेश अनिलराव कोंडेकर (अमरावती) -Innovative Seed Sowing
  8. Machine
  9. ओंकार अनिल शिदे  (बीड) - Smart Knife for Slicing
  10. or Chopping an Onion 
  11. संजीवनी अनिल पुरी (जालना) - Hygienic Tea Cup
  12. Serving Tray
  13. आदित्य सुधाकर शिंगणे (नागपूर) - Toilet and Bathroom
  14. Pipes Blockage Cleaner

इंस्पायर अवार्ड लिस्ट 2022 | Inspire Award 2022 List


इंस्पायर पुरस्कार 2022 (INSPIRE Awards) विजेते (अंतिम 60 विद्यार्थी) यादी येथे डाउनलोड करा.

इंस्पायर पुरस्कार 2023 (INSPIRE Awards2023)

इंस्पायर पुरस्कार 2023 (INSPIRE Awards2023) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. (Online nominations for the year 2022-23 are open until Sept 30, 2022.)

इंस्पायर अवार्ड 2022-23 लास्ट डेट | Inspire Award 2022-23 Registration

INSPIRE Awards- MANAK योजनेअंतर्गत नोंदणीकृत शाळा, शैक्षणिक वर्षात त्यांच्या शाळांमधून 2 किंवा 3  सर्वोत्कृष्ट कल्पना, ऑनलाइन ई मॅनेजमेंट ऑफ इन्स्पायर अवॉर्ड स्कीम (E-MIAS) मध्ये नामांकित करू शकतात.

INSPIRE Awards- MANAK Official Website

www.inspireawards-dst.gov.in 

2022-23 साठी ऑनलाइन नामांकन हे 01 जुलै, 2022 पासून पुन्हा सुरू झाले असून,. शाळा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांचे ऑनलाइन नामांकन सबमिट करू शकणार आहे.


हे सुद्धा वाचा
प्रत्येक नविन अपडेट - 'शिक्षण मित्र' वेबसाईट - सोशल मिडिया जॉईन करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post