तुमच्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे 5 सोपे मार्ग

लहान मुलांमध्ये असणारी एक प्रमुख समस्या सध्या आपल्याला दिसून येते, ती म्हणजे मोबाईलचे लागलेले वेड आणि ही सर्व पालकांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. प्रत्येक घरामध्ये लहान मुल मोबाईल साठी हट्ट करत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा अधिक वेळ हा लहान मुलांचा मोबाईल मध्ये जात आहे. लहान मुलांमध्येच नाही तर लहानापासून मोठ्यापर्यंत देखील सर्वजण मोबाईल च्या विळख्यात सापडले आहेत. आजच्या या आर्टिकल मध्ये आपण आपल्या घरातील लहान मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवायचे? (How To Keep Children Away From Mobile) याबद्दलचे सोपे उपाय कोणते आहे? ते पाहणार आहोत. मी आपल्याला खात्रीने सांगू शकेल की, आपण हे खालील उपाय जर करून बघितले तर निश्चितच आपण लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवू शकाल. हे उपाय स्वतः आम्ही घरातील लहान मुलांसोबत केले आहे. मला चांगला प्रतिसाद या बाबतीत दिसून आला. मला खात्री आहे की आपण देखील हे उपाय करून पाहिल्यानंतर लहान मुलांपासून मोबाईल दूर राहील यासाठी आपण निश्चित हे खालील उपाय करून पहावे.


तुमच्या मुलाला मोबाईलपासून दूर ठेवण्याचे 5 सोपे मार्ग | How To Keep Children Away From Mobile


How To Keep Children Away From Mobile


मोबाईल पासून दूर रहा


आपल्याला ठाऊक असेल की, लहान मुले हे मोठ्यांचे बघून-बघून शिकत असतात. मोठ्यांचे अनुकरण करून ते शिकत असतात. सहाजिकच आहे हे सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील जे पालक आहेत? त्यांनी सर्वप्रथम मोबाईल पासून दूर राहायला हवे. 

विशेष करून जेव्हा आपण मुलांसमोर असतो तेव्हा आपण मोबाईल आपल्यापासून दूर ठेवायला हवा आणि आपण मुलांसोबत वेळ घालवायला हवा. मोबाइल व्यतिरिक्त जे आपलं इतर काम असेल ते आपण करायला हवे. 

पहिला उपाय हाच करायचा आहे तो म्हणजे मुलांसमोर आपण मोबाईल बघायचा नाही किंवा मोबाईल हा मुलांसमोर आपण वापरायचा नाही. हा जर उपाय आपण केला तर निश्चितच मुलेसुद्धा आपल्याकडे मोबाईल मागण्याचा हट्ट करणार नाही.

जास्तीत जास्त आपण मुलांसमोर आपल्या हातामध्ये मोबाईल राहणार नाही याची काळजी आपण या पहिल्या उपायांमध्ये घेणार आहोत. काही दिवस हा उपाय आपण अवश्य करून पहावा निश्चितच आपल्याला तात्काळ बदल यामध्ये दिसून येईल. 

मुलांचे मनोरंजन करा


लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी चा दुसरा उपाय म्हणजे आपल्याला मुलांचे मनोरंजन करायला हवे. लहान मुलांना सतत काहीतरी हवे असते. खेळायला त्यांना आवडत असते. अशा वेळी आपण त्यांचे मनोरंजन करायला हवे. 

लहान मुलांचे मनोरंजन करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे मुलांना डान्स करायला खूप आवडते. अशावेळी आपण मोबाईल मध्ये गाणी न लावता, आपल्या टीव्ही गाणी लावून त्यांना डान्स करायला शिकवायला हवे,यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम देखील होईल आणि मुलांच्या आवडीचा डान्स करत असल्यामुळे मुले यामध्ये व्यस्त राहतील. 

लहान मुलांसाठी मनोरंजनाचा वेगळा पर्याय म्हणजे मुलांना खेळायला खूप आवडते. अशावेळी आपण लहान मुलांना मैदानावर घेऊन जावेत, या ठिकाणी आपण मुलांसोबत खेळावे किंवा लहान त्यांच्या समवयस्क मुलांसोबत मुलांना खेळू द्यावे. त्यासोबतच घरामध्ये सुद्धा आपण बैठे खेळ मुलांसोबत खेळू शकतो. लहान मुलांची विशेष अशी खेळणी असते त्याच्यासोबत सुद्धा मुले खेळतात.

घरामध्ये जर एकच लहान मुल असेल तर अशा वेळी आपल्या शेजारील आजूबाजूचे लहान मूल यांच्यासोबत त्या मुलाला खेळू द्यावे. त्यामुळे समवयस्क मुलांसोबत खेळल्यामुळे मुल व्यस्त राहते आणि आवडीने खेळते. 

चित्रकला यामध्ये देखील मुलांना चित्रांमध्ये रंग भरायला खूप आवडते किंवा विविध चित्र काढायला सुद्धा आवडते. यामध्ये मुलांना गुंतवून ठेवता येईल.

मनोरंजनाचे असे विविध पर्याय आपल्याला शोधून मुलांचे मनोरंजन होईल असे पर्याय शोधून त्यामध्ये आपल्याला मुलांना व्यस्त ठेवता येईल. यामुळे मुलांचे मनोरंजन होईल आणि मुले मोबाईलचा हट्ट करणार नाही हा पर्याय आपण निश्चितच मुलांसोबत करून पाहायला हवा.

मुलांशी बोला


लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी चा तिसरा उपाय म्हणजे मुलांशी बोला सध्या काय झाले की, मोबाईल च्या विळख्यामध्ये आपण सर्वजण एवढे गुंतून गेलो की, आपल्याला एकमेकांसोबत बोलण्यासाठी आजकाल वेळच राहिलेला नाही.

लहान मुलांना जर आपल्याला मोबाईल पासून दूर ठेवायचे आहे. तर आपल्याला मुलांशी बोलावे लागेल, मुलांशी खेळावे  लागेल, घरांमध्ये मुलांसोबत आपल्याला वेगवेगळ्या विषयावर बोलावं लागेल. परंतु आता झाले कसे की एका हातामध्ये मोबाईल आणि आपले संपूर्ण लक्ष मोबाईल मध्ये असल्या नंतर आपण मुलांसोबत बोलतो हे संपूर्ण चुकीचे आहे.

मोबाईल सर्वप्रथम आपल्याला दूर ठेवा. मुलांसोबत बोलावे, मुलांशी गप्पा माराव्या, मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगा,  मुलांचा अभ्यास घ्या अशा जर कृती आपण केल्यात तर आपण मुलांना जास्तीत जास्त बोलायला संधी देऊ शकू. आणि त्यांचे जास्तीत जास्त ऐकून घेऊ त्यामुळे मुले ही आनंदी राहतील.

दिनचर्या ठरवून घ्या


आदर्श जीवन शैली ही प्रत्येकाला हवी आहे यासाठी आपल्याला एक आदर्श दिनचर्या ठरवून घ्यावी लागेल. स्वत: पासून सुरुवात करून मुलांना देखील एक चांगली सवय आपल्याला लावावी लागेल यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत च्या सर्व दैनदिन कामे आपल्याला वेळच्यावेळी करावे लागतील.

लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवण्यासाठी जर आपण मुलांना एक चांगली सवय लावली त्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ची दिनचर्या जर मुलांची ठरवून घेतली, त्यामध्ये मुलांचा अभ्यास, खेळ, मनोरंजन, शाळेची वेळ इतर कामे ही जर आपण वेळच्यावेळी करून घेतले आणि मुलांना त्यामध्ये व्यस्त ठेवले तर निश्चितच मुले मोबाईल पासून दूर राहतील.

मोबाईल च्या अंतर्गत Apps आणि सेटिंग्ज बदला


कधी-कधी अशी तक्रार येऊ शकते की, मोबाईल कितीही लांब ठेवला तरी मुले पुन्हा-पुन्हा मोबाईल मागतात. यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्या मोबाईल मध्ये ज्या काही सेटिंग्ज आहेत त्या आपल्याला बदलावे लागतील. 

उदा. आपल्याला आपले इंटरनेट हे बंद करून ठेवायचे आहे आणि सेटिंगला एक चांगला पासवर्ड द्यायचा आहे. की जेणेकरून मुले ते इंटरनेट चालू करू शकणार नाही हा एक पर्याय आपण करू शकतो.

त्या सोबतच काही असे मोबाईल मधील ॲप्स आहेत कि ते, ॲप्स आपल्याला HIDE करून ठेवता येऊ शकते. की जेणेकरून मोबाईल जरी मुलांनी घेतला तरी मुले यूट्यूब किंवा गेम्स चे ॲप्लिकेशन बघू शकणार नाही.

त्यामुळे मुलांना एक प्रकारे कंटाळाही आणि मुले मोबाईल पासून लांब जातील असे काही ॲप्स आणि सेटिंग आपण बदलली तर निश्चितच मुले मोबाईल पासून दूर राहतील हा एक उपाय आपण करून पहा.

सारांश

लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आपण प्रभावी असेल 5 मार्ग कोणते आहेत How To Keep Children Away From Mobile किंवा उपाय कोणते करता येऊ शकते? याबद्दल ची माहिती घेतली सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतः पासून आपला मोबाईल दूर ठेवायला हवा आणि जास्तीत जास्त वेळ हा लहान मुलांना मनोरंजन खेळ इतर कामांमध्ये व्यस्त ठेवायला हवे तरच मुलांपासून मोबाईल दूर राहिल. त्याचबरोबर मोबाईल मधील काही महत्त्वाच्या सेटिंग साडी ॲप्स लपवून ठेवायला हवेत. अशा पद्धतीने लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवता येईल.

हे सुद्धा वाचा

Post a Comment (0)
Previous Post Next Post