गुगल कडून विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये जिंकण्याची संधी | Doodle for Google Competition 2022

गुगल द्वारे भारतातील इयत्ता १ ली ते १० वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी गुगल डूडल (Doodle 4 Google Competition) तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये व इतर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या विशेष लेखामध्ये Doodle for Google Competition 2022 ची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तेव्हा अवश्य गुगल डूडल स्पर्धा समजून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील ही माहिती शेयर करा.

Doodle for Google Competition 2022

गुगल डूडल विजेत्या स्पर्धकास बक्षीस किती व कोणते मिळणार? Doodle for Google Prizes

गुगल या कंपनी कडून (National Winner) राष्ट्रीय विजेत्या स्पर्धकास ५ लाख रुपयाचे तर त्यांच्या शाळांना २ लाख रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. 4 गट विजेत्यांना २ लाख रुपयाचे बक्षीस तर त्यांच्या शाळांना १ लाख रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. 

सोबतच गुगलकडून प्रमाणपत्र व ट्रॉफी (Certificate / Trophy of achievement),  गुगलचे हार्डवेअर (Google hardware) , Fun Google schwag इ. बक्षिसे गुगलकडून देण्यात येणार आहे. तसेच २० स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी (Certificate / Trophy of achievement), Fun Google schwag इ. बक्षिसे गुगलकडून देण्यात येणार आहे.

गुगल डूडल ची या स्पर्धेची थीम काय आहे? | This year’s Doodle for Google theme 2022

या स्पर्धेची थीम ही This year’s Doodle for Google theme is - In the next 25 years, my India will… अशी आहे. या विषयाशी निगडीत विद्यार्थ्यांना गुगल डूडल तयार करायचे आहे. म्हणजे येणाऱ्या २५ वर्षात माझा भारत देश असा असेल. याविषयीचे चित्र काढायचे आहे. चित्र काढताना Google या लोगो मध्ये ते चित्र काढायचे आहे. 

This year’s Doodle for Google theme is 

"In the next 25 years, my India will…"

गुगल डूडल काय आहे? | What is Google Doodle

Doodle for Google Competition 2022


गुगल डूडल हे आकर्षक, मजेदार  (Fun creative picture) आणि सर्जनशील (कल्पकता व नाविन्यता) असणारे Google या शब्दामध्ये ते रेखाटलेले चित्र असते. गुगल डूडल हे गुगल द्वारे गुगल सर्च इंजिन लोगो मध्ये ठेवले जाते. वर्षभरातील एखाद्या दिनविशेष दिवशी, प्रसिद्ध कलाकार, व्यक्ती, शास्रज्ञ किंवा सुट्टीच्या दिवशी गुगल सर्च इंजिन लोगो मध्ये गुगल डूडल हे आपल्याला पहायला मिळते.

गुगल डूडल कसे तयार करावे?

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेचा सर्जनशील विचार करून गुगल डूडल तयार करायचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घेता येणार आहे. येणाऱ्या २५ वर्षात माझा भारत देश असा असेल. (In the next 25 years, my India will) या विषयावर विद्यार्थ्यांनी सर्जनशील विचार करून आपल्या कल्पकता व नाविन्याचा विचार करायचा आहे. आणि भविष्याचा विचार करण्यासाठी पालक व शिक्षकांनी मदत करणे आणि Google या लोगो मध्ये चित्र काढण्याचा सराव करायचा आणि ३० सप्टेंबर पूर्वी आपले अंतिम चित्र सबमिट करायचे आहे.

गुगल डूडल विजेत्या स्पर्धकाचे डूडल हे गुगल कधी लोगो मध्ये ठेवणार?

गुगल डूडल विजेत्या स्पर्धकाचे गुगल डूडल हे १४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण दिवस (२४ तास) गुगल लोगो मध्ये विजेत्या स्पर्धकाचे गुगल डूडल आपल्याला पाहायला मिळेल. (your artwork displayed for a day (24 hours) on Google.co.in on November 14th, 2022)

गुगल डूडल कोठे सबमिट करावे?

 येणाऱ्या २५ वर्षात माझा भारत देश असा असेल. (In the next 25 years, my India will) या विषयावर आपण काढलेले  गुगल डूडल हे ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी https://doodles.google.com/intl/ALL_in/d4g/enter/ या गुगलच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. महत्वाच्या लिंक पोस्ट च्या खाली दिलेल्या आहेत.

गुगल डूडल स्पर्धेत कधी सहभागी व्हावे? 

गुगल डूडल  (Doodle for Google) ही स्पर्धा ५ ऑगस्ट पासून सुरु झालेली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे अजूनही संधी उपलब्द असून अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. (Doodle for Google participants is 5th August 2022 and the closing date for receipt of entries by Google is extended to 30th September 2022)

गुगल डूडल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महत्वाच्या लिंक 

  1. यापूर्वीचे गुगल डूडल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. गुगल डूडल स्पर्धा नियम Contest Rules वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. गुगल डूडल स्पर्धा Submission form Download करण्यासाठी येथे क्लिक करा. 
  4. गुगल डूडल स्पर्धा Prizes वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. गुगल डूडल तयार करण्यासाठीचे Videos (Educator Resources) येथे पहा.
  6. गुगल डूडल फॉर्म व तयार केलेले डूडल येथे अपलोड करा.


प्रत्येक नविन अपडेट - 'शिक्षण मित्र' वेबसाईट - सोशल मिडिया जॉईन करा.नवनविन अपडेट साठी  शिक्षण मित्र या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post