१३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना रु. १० लाख जिंकण्याची संधी | Jigyasa Azadi Ka Amrit Mahotsav Quiz

१३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना रु. १० लाख जिंकण्याची संधी | Jigyasa Azadi Ka Amrit Mahotsav Quiz 

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र सरकार मार्फत संपूर्ण देशभर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

त्यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातीलच एक म्हणजे जिज्ञासा:आझादी का अमृत महोत्सव क्विझ (Jigyasa: Azadi Ka Amrit Mahotsav Quiz)

Jigyasa Azadi Ka Amrit Mahotsav Quiz


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सयुंक्त विद्यमाने जिज्ञासा:आझादी का अमृत महोत्सव क्विझ (Jigyasa: Azadi Ka Amrit Mahotsav Quiz) सुरु करण्यात येत आहे.

akamquiz.com या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने मुलांना नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२२ आहे. 

वय वर्ष १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थी नोंदणी करू शकतात. 

Jigyasa: Azadi Ka Amrit Mahotsav Quiz 17 भाषांमधून जिल्हा,राज्य,क्षेत्रीय व राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणार आहे.

जिज्ञासा:आझादी का अमृत महोत्सव क्विझ मधील विजेत्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामध्ये 

प्रथम क्रमांकासाठी- रु. १० लाख 

द्वितीय क्रमांकासाठी - रु. ५ लाख 

तृतीय क्रमांकासाठी - रु. २.५ लाख

प्रोत्साहनपर - ३ विजेता संघास रु. २ लाख आणि ४ विजेता संघास रु. १ लाख अशा प्रकारच्या स्वरुपाची शिष्यवृत्ती विजेत्यांना मिळणार आहे.

तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी अवश्य वय वर्ष १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. 

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

{getButton} $text={Website Link} $icon={link}


Post a Comment (0)
Previous Post Next Post