आयटी (IT) कंपनीत मेगा भरती 12 वी पास मुलांना नोकरीची संधी

आयटी (IT) कंपनीत मेगा भरती 12 वी पास मुलांना नोकरीची संधी


IT Jobs


करिअर हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा विषय आहे. आपली आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी ओळखून जर आपण योग्य क्षेत्रात करिअर केले तर नक्कीच आपण उच्च शिखरापर्यंत सहज पोहोचू शकतो.


सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते भविष्यामध्ये देखील याची व्याप्ती वाढणार यात शंका नाही. आपल्याला जर तंत्रज्ञानामध्ये आयटी क्षेत्रामध्ये आवड असेल तर ही संधी आपल्यासाठी आहे.

नुकताच दहावी-बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि याच धर्तीवर 12 वी पास मुलांसाठी 20 हजार विद्यार्थ्यांना नामांकित IT कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. 


कशी आहे योजना जाणून सविस्तर


महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड (HCL) या आयटी क्षेत्रातील कंपनी यांचा संयुक्त उपक्रम आहे.

एकूण जागा- 20,000

MYLAP- विद्यावेतन + नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण

(विद्यार्थी हा मार्च 2021 व 2022 मध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. बारावीत गणित विषय घेऊन सर्व विषयात एकूण 50 टक्केपेक्षा जास्त गुण आणि गणित विषयात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले असावे.

Aptitude Test, Interview 

एक वर्षाचे ट्रेनिंग (6 महिने ऑनलाइन व 6 महिने ऑफलाईन)

ऑफलाईन काळात रु. 10,000 विद्यावेतन प्रति माह देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण संपल्यानंतर रु. 2,20,000 प्रति वर्ष सॉफ्टवेअर कंपनीत जॉब देणार आहे. 

पुढे कंपनी मार्फतच नामांकित विद्यापीठामधून आय टी क्षेत्रात शिष्यवृत्तीसह पदवी प्राप्त करण्याची संधी.



https://registrations.hcltechbee.com/

करिअर संबंधित इतर लेख वाचा


Post a Comment (0)
Previous Post Next Post