दहावीचा निकाल आज होणार जाहीर ! येथे पहा निकाल

प्रतिक्षा संपली ! 10 वी चा निकाल आज दुपारी 1 वाजता

ssc exam result 2022


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यामिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन  जाहीर होणार आहे.


महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दिनांक 17 जून रोजी दुपारी 1 ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

१० वी बोर्ड परीक्षेस राज्यातील १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 💐 

इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट चा वापर करावा.

अधिकृत संकेतस्थळ




ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती http://verification.mh-ssc.ac.in 
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Post a Comment (0)
Previous Post Next Post