आनंदाची बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारी अधिकारी/कर्मचारी यांच्या बदली अधिनियमानुसार बदलीची कार्यवाही करण्याबाबत सामान्य प्रशासनाने नुकतेच कळविले आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५" मधील तरतूदीनुसार सन २००५ पासून प्रतिवर्षी बदली करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने प्रशासकीय विभागाच्या स्तरावरुन एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात.

तथापि, कोविड-१९ च्या काळामध्ये उद्भवलेल्या महामारीमुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या अपवादात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सन २०२० च्या एप्रिल व मे महिन्यात तसेच सन २०२१ च्या एप्रिल व मे महिन्यात बदली अधिनियमातील तरतूदीनुसार सर्वसाधारण बदल्या न करण्याबाबतचे विवक्षित आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आले होते.

थोडक्यात केवळ मागील दोन वर्ष, अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन, सामान्य प्रशासन विभागाने बदली संदर्भात विवक्षित आदेश निर्गमित आले होते.

आता, बदली अधिनियमानुसार प्रतिवर्षी बदली प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करणे अभिप्रेत आहे. असे सामान्य विभागाने परिपत्रकात म्हंटले आहे.




Post a Comment (0)
Previous Post Next Post