राम नवमी 2022 विशेष - रामनवमी कथा : मुहूर्त | Ram Navami 2022 Wishes

चैत्र महिन्यातील राम नवमी (Ramnavmi) म्हणजेच प्रभू श्रीरामाचा जन्म दिवस श्री राम नवमी २०२२ यंदा १० एप्रिल रोजी उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे काही निर्बंध असल्याने यंदा मात्र मोठ्या जल्लोषात राम नवमी 2022 साजरी केली जाईल. 

प्रभू श्री राम यांचे जन्मस्थान हे आयोध्या येथे आहे. आयोध्याच्या काठी असलेल्या सरयू या नदीत स्नान करणे हे शुभ मानले जाते. यादिवशी लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाचे स्मरणकरून पूजा करतात. हिंदू धर्मीयांसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

Ram Navami 2022 Wishes


राम नवमी 2022 विशेष - रामनवमी कथा : मुहूर्त | Ram Navami 2022 Wishes

प्रभू श्री राम यांचा जन्म केव्हा झाला?

चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी रामनवमी हा सण साजरा केला जातो. यंदा Ram Navami  रविवारी Date 10 एप्रिल 2022 रोजी आहे. भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम यांचा जन्म हा चैत्र शुद्ध नवमी दु. १२ वाजता झाला. 

राम नवमी मुहूर्त 

प्रारंभ - दिनांक ९ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध नवमी रात्री ८ वाजून २४ मी. ला सुरुवात होईल.

समाप्ती- दिनांक ११ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध नवमी पहाटे ३ वाजून १५ मिनिटाला समाप्त होईल.

राम नवमी पूजन मुहूर्त - दिनांक १० एप्रिल सकाळी ठीक ११ वाजून ६ मिनिटे ते दुपारी ठीक १ वाजून ३९ मिनिटापर्यंत श्रीराम पूजनाचा मुहूर्त आहे.

राम नवमी इतिहास कथा 

प्रभू श्री राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. राम नवमीचा इतिहासाची कथा रामायणामध्ये  अशी सांगितली आहे. की, आयोध्याचा राजा म्हणजे दशरथ यांना तीन पत्नी होत्या. त्यांचे नाव कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी असे होते. मात्र सुरुवातीच्या काळात खूप दिवस उलटूनही या तिन्ही पत्नीकडून संतती प्राप्त झाली नाही. यासाठी आयोध्याचा राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञ झाल्यानंतर या तीन पत्नींना दशरथ यांनी खीर खायला दिली. त्यांनतर दशरथ यांच्या तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. त्यामध्ये ज्येष्ठ राणी कौशल्या हिने रामाला जन्म दिला. तर कैकयीला भरत हा पुत्ररत्न प्राप्त झाला. आणि सुमित्राने जुळ्यांना जन्म दिला. त्यांचे नाव लक्ष्मण व शत्रुघ्न होते. रावणाचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला अशी रामायणामध्ये कथा आहे.

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम. 

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


हे सुद्धा वाचा

Post a Comment (0)
Previous Post Next Post