शाळा सुरू ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी शासन वेगवेगळ्या उपायोजना करत आहे. गेल्या दोन वर्षापासून शाळा आणि कॉलेज (School and college) बंद करण्यात आले होते. काही काळासाठी कोरूना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र शैक्षणिक वर्षाच्या तासिका पूर्ण होऊ शकले नाही यासाठी आता शासनाने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होणे बाबत काय आहे तो निर्णय वाचा पुढे
मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती सह शाळा सुरु ठेवण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. एप्रिल महिन्यात खरे तर मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असते. मात्र आता शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहणार असल्याचे परिपत्रकात म्हंटले आहे. इतकंच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी लांबणीवर जाण्याचे संकेत दिसत आहे.
शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ली ते ९ वी आणि इयत्ता ११ वीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा असे आदेशात म्हंटले आहे.
कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. यासाठी आता एप्रिल महिन्यात देखील मुलांचा अभ्यास सुरू राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे राज्यातील सर्व आस्थापना / कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
>> सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात.
>> माहे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवता येईल.
>> इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील ३ ऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा.
>> सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात.
>> दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.
>> यापूर्वी दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले अधिकार अबाधित राहतील.
>> २० जानेवारी, २०२२ चे परिपत्रक
आणखी वाचा