कोरोना संकट निबंध मराठी | Corona Sankat Nibandh Marathi

कोरोना संकट निबंध मराठी | Corona Sankat Nibandh Marathi 

प्रस्तावना

जगामध्ये थैमान मांडलेल्या कोरोना व्हायरस हा एक प्रकारचा विषाणू आहे. असे बरेच प्रकारचे विषाणू अगोदरपासूनच या पृथ्वीतलावर आहेत. परंतु नव्याने आलेला कोरोना व्हायरस (Covid- 19) म्हणून ओळखला जाणारा विषाणू सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV-2) हा जगभरात सर्वत्र (साथीचा रोग ,Pandemic) आजार होण्यास कारणीभूत आहे. हा रोग एक तीव्र संसर्गजन्य श्वसन संस्थेशी संबंधित महामारी आहे.

Corona Sankat Nibandh Marathi

कोरोना व्हायरस (Novel Coronavirus - 2019 - Covid-19), या आजारावर सध्या कोणतेही औषध सापडलेले नाही. कोरोना विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु जगापेक्षा भारतामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही बाब आपल्यासाठी चांगली आहे. तरीही आपल्याला कोरोना होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अतिशय चांगले. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली आपणास दिसून येते. त्यामुळेच कोवीड-19 चे जास्त रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, अशक्त व्यक्ती, वेगवेगळे आजारी लोक तसेच जे पहिल्यापासून कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह तसेच टीबी यांसारख्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.


पार्श्वभूमी

कोरोना व्हायरसचा उगम कोरोनाव्हायरस ची उत्पत्ती चीनच्या 'वुहान' शहरांमधून झाली होती. कारण जगातील पहिले रुग्ण याच शहरात सापडले होते. याचे एक कारण असेही आहे की, या शहरात विविध प्रकारांच्या पशुपक्ष्यांच्या प्रजातीचे मास विकले जाते.  काही शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, याच पशुपक्ष्यांना ज्या बाजारात विकले जायचे. तेथे एका वटवाघळाची प्रजाति या वायरसने संक्रमित होती.  याच वटवाघुळाचे मास खाल्ल्याने हा व्हायरस माणसांमध्ये पसरायला लागला. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की वुहान शहरात असलेली एक संस्था जिचे नाव "वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी" आहे. या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरला. मात्र अद्याप कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत.

कोरोना विषाणू ची लक्षणे

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कोरोनाची लक्षणे प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी आढळून आलेली आहे. मात्र त्यामध्ये ताप, सर्दी, खोकला ही सामान्य लक्षणे आहेत. त्यासोबतच इतर लक्षणे खालीलप्रमाणे आढळून येतात. हे प्रत्येक रुग्णानुसार वेगळे असू शकते. असेही रुग्ण आढळून आले की, त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसून आली नाहीत.
 1. कोरोना विषाणूची लक्षणे ही सामान्य तापाप्रमाणेच असतात.मानवी शरीरावर पोहोचल्यानंतर कोरोनाचा विषाणू फुफ्फुसात संक्रमित होतो. यामुळे प्रथम ताप यायला सुरुवात होते. आणि त्यानंतर कोरडा खोकला सुरु होतो.
 2. खोकल्यामुळे घसा दुखी चालू होते. नंतर श्वास घेण्यास त्रास होतो.
 3. सर्दी, थंडी वाजून येण.
 4. धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, खूपच अशक्त वाटणे.
 5. फुप्फुसांना सूज येते, जास्त खोकल्यामुळे फुफ्फुसांना सूज येऊ शकते व छातीत दुःखू लागते.
 6. तीव्र डोकेदुखी, गरगरणे, चक्कर आल्यासारखे वाटणे.
 7. खोकला - घसा दुखी, घश्याला सूज येणे, घसा खवखवणे, शिंका येणे.
 8. अंग जड होणे, स्नायूमधे वेदना होणे, 
 9. सांधेदुखीचा त्रास वाढणे.
 10. चव किंवा गंध कमी होणे.
 11. खोकला, डोकेदुखी, सौम्य ताप यासारखी किरकोळ लक्षणेही सामान्य माणसाला नेहमीची वाटणारी लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोना व सामान्य ताप यामधील अंतर ओळखणे फार अवघड जाते. तसेच याचा कालावधी  हा साधारण पणे १४ दिवस इतका दीर्घ असतो. 

उपाययोजना 


कोरोना किंवा श्वसनावाटे पसरणाऱ्या स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी खालील खबरदारी घेणे आरोग्यासाठी हिताचे आहे.
 1. श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
 2. हात वारंवार धुणे.
 3. शिंकताना,खोकताना नाका तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे.
 4. अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.
 5. फळे,भाज्या न धूता खाऊ नयेत.

कोरोना व्हायरस (COVID-19) पासून स्वत: चे आणि इतरांचेही संरक्षण करा. आपण काही सामान्य सावधगिरी बाळगून कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची किंवा तो इतरांमध्ये पसरण्याची शक्यता कमी करू शकता.
 • शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी पोषक आणि आरोग्यदायी आहार घ्या.
 • स्वच्छतेचे नियम पाळा.
 • बाहेर गेल्यावर कोणत्याही वस्तूला हात लावू नका तसेच जर हात लावण्याची वेळ आलीच तर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
 • आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
 • खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा आणि शक्यतो मास्क वापरा.
 • जर कुणाला भेटायला किंवा बाहेर गेलात तर स्वत: आणि इतरांमध्ये कमीतकमी 1 मीटर (3 फूट) अंतर ठेवा.
 • बाहेर जाताना नेहमी मास्क वापरा.
 • साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा.
 •  गरज नसताना गर्दीमध्ये जाण्याचे टाळा.
 • ज्यांना सर्दी, खोकला झालेला आहे अशा लोकांशी संपर्क टाळा.
 • परदेशातून आलेल्या पाहुण्यांना किंवा मित्रांना लगेच भेटायला जाऊ नका.
 • जर असे लोक तुमच्या घरा शेजारी राहत असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळा.
 • खोकला, डोकेदुखी, सौम्य ताप अशी किरकोळ लक्षणे असली तरी आपण बरे होईपर्यंत घरीच रहा आणि स्वत:ला व इतरांना कोरोना विषाणूपासून अलग ठेवा.
 • जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागला तर वैद्यकीय सल्ला घ्यायला विसरू नका आणि आपल्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून योग्य ते निर्देश दिले जातात,त्यांचे अनुसरण, पालन करा. ते आपले संरक्षण देखील करेल आणि व्हायरस आणि इतर जंतू संसर्गाचा फैलाव रोखण्यास देखील मदत करेल.
 • WHO डब्ल्यूएचओ किंवा आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा.
कोरोना एक जागतिक संकट विषयावर वेगवेगळ्या विचार प्रक्रियेतून 'कोरोना संकट' निबंध लेखन करता येईल. कोरोना संकट मराठी निबंध अजून सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

>> 'कोरोना संकट ' मराठी निबंध CORONA NIBANDH MARATHI

कोरोना व्हायरस एक जागतिक संकट 

जगभरात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरस सध्या नविन असल्यामुळे त्यावर वेगवेगळे संशोधन सुरु आहे. एकदा का या विषाणूची माणसाला लागण झाली की हा आजार संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये झपाटयाने प्रसारित होतो. 

कोरोना व्हायरसची संसर्गक्षमता खूपच जास्त आहे. कोरोना विषाणू ने अनेक गोरगरीब जनतेचे, व्यापारी,शेतकरी ,दुकानदार, मजूर, कामगार यांची हाल झाले. बेरोजगारी वाढली, काही व्यवसाय बंद ठेवावे लागले. 

कोरोना विषाणू बाधित व्यक्ती इतर लोकांच्या संपर्कात आल्याने लवकर इतरांना बाधित करतो. संपर्क तोडणे हे मोठे अवघड झाले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने झपाट्याने प्रसार होतो त्यामुळे शासनाला अनेक कडक नियमावली जाहीर करणे आवश्यक असते त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे रोजीरोटीची प्रश्न उभे राहतात. त्यामुळे कोरोना महामारी ही जगापुढे खूप मोठे आव्हान असून खूप मोठे संकट आहे.

Post a Comment

Previous Post Next Post