25 टक्के कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम | Reduced syllabus 2021-22

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम | Reduced syllabus 2021-22


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी पहिली ते बारावी चा अभ्यासक्रम 25 % कमी करण्यात आला होता. यंदाही चालू शैक्षणिक वर्षांमध्ये अद्याप पर्यंत, शाळा सुरळीतपणे सुरू झालेल्या नाहीत. 
या धर्तीवर ऑनलाईन/ऑफलाइन शिक्षणाचा विचार करता 25% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यामध्ये घेतलेला आहे. 

मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी राज्यभर १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालवधीत सेतु अभ्यासक्रम राबविण्यात आला असून, आता यानंतर पुढील शिक्षण मुलांसाठी चालू शैक्षणिक वर्षातील 25% ने कमी केलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे.

विहित वेळेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण होण्याच्या उद्देशाने तणावमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणातील उद्दिष्ट साध्य करता यावीत या अनुषंगाने हा 25% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. 

कमी केलेलाअभ्यासक्रम/ पाठ्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र राज्य (SCERT Pune) अधिकृत वेबसाईट https://maa.ac.in/ वरती उपलब्ध करून देण्यात आला आहे.

maharashtra ssc board reduced syllabus 10th pdf 2021-22 इयत्ता पहिली ते बारावीचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी २५% ने कमी केलेला अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post