आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२२-२०२३ | RTE Admission F.A.Q.

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२२-२०२३ | RTE Admission F.A.Q. 

RTE Admission

{tocify} $title={Table of Contents}

आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्र

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये कलम १२ (१) (सी) नूसार खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये  २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई प्रवेश 2022-23 प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज दि. १६/०२/२०२२ पासून RTE पोर्टल वर भरता येणार आहे. 

>> RTE admission age limit in marathi | बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा 

आरटीई २५% प्रवेश संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न F.A.Q. 

RTE प्रवेश नियम मराठी वाचण्यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न , RTE FAQ PDF अवश्य वाचावी.

१) आरटीई २५% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत ? | Who is eligible for RTE in Maharashtra?

Who is eligible for RTE in Maharashtra?

उत्तर:- दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत आहे. अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेशासाठी पात्र आहेत.

२) वंचित गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो ?

उत्तर:- वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/ एच. आय. व्ही. प्रभावित बालके यांचा समावेश आहे.

३)  दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो ?

उत्तर:- दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे / ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न १ लाखाच्या आत आहे अशा बालकांचा सामावेश आहे. SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल (१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ) गटामधून प्रवेश अर्ज भरता येईल.

४) कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? (माध्यम व बोर्ड) 

उत्तर- सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. व आय.बी. सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित, प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग १ ली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. (मदरसा,मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून) 

५) पालकांना अर्ज केव्हा करता येईल ?

उत्तर:- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशासाठी दिनांक १६/२/२०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

6) आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी कोणती अधिकृत वेबसाईट आहे? 

उत्तर- RTE प्रवेश अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी वेळोवेळी  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या संकेतस्थळास भेट द्या.

७) RTE  F.A.Q.

आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षातील F.A.Q. अवश्य वाचा.


>> आर.टी.ई. २५% प्रवेश प्रक्रिया २०२२ | RTE 25% Admission 2022


८) आरटीई प्रवेश 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? | How can I register for RTE in Maharashtra?

उत्तर- आरटीई प्रवेश 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ पासून अर्ज करता येणार आहे. (How can I register for RTE in Maharashtra?) अर्ज करण्यासाठी RTE PORTAL वरून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेली आहे. महत्वाच्या अपडेट साठी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex ला भेट द्या.


९) आरटीई प्रवेश 2022-23 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?


 
आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२२-२०२३ संदर्भात अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.Post a Comment

Previous Post Next Post