राज्यातील शिक्षकांना मिळणार ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण | Google Classroom Training

राज्यातील शिक्षकांना मिळणार ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण 


कोव्हीड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी प्रभावी तंत्रज्ञानाचा उपयोग करून मुलांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवले. या आपत्कालीन परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण हा पर्याय समोर आला. ऑनलाईन शिक्षणाचे महत्व वाढू लागले. 
राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये, शिक्षणात खंड पडू नये यासाठी शासन स्तरावरून शालेय शिक्षण विभागाच्या मध्यामातून विविध ऑनलाईन माध्यमाचा वापर केला गेला. 
Google classroom teacher training

ऑनलाईन शिक्षणाचे महत्व लक्षात घेता शालेय शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून राज्यातील ४०,००० शिक्षकांना पहिल्या टप्प्यामध्ये गुगल क्लासरूम चे ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. सद्यस्थितीत राज्यातील शाळा सुरु झाल्या असून, दैनदिन अध्ययन-अध्यापनात विविध डिजिटल माध्यमाचा प्रभावी व यशस्वी वापर करता येणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेता राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन स्वरुपात गुगल क्लासरूम चे प्रशिक्षण २३ व २४ डिसेंबर रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व गुगल यांच्या सयुंक्त विद्यमाने देण्यात येणार आहे.

गुगल क्लासरूम प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश


विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अध्ययनास देणे, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने मूल्यमापन करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्ययन-अध्यापनाचा , गृहपाठाचा, सूचनांचा त्यांच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा.

गुगल क्लासरूम प्रशिक्षणाचा विषय 


Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom

अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण कालावधी – २ दिवस
प्रशिक्षण तारीख – २३ व २४ डिसेंबर २०२१
वेळ :- दुपारी ३ ते ५
प्रशिक्षणाचे स्वरूप :- ऑनलाईन
ऑनलाईन YouTube लिंक 

दि. २३ डिसेंबर २०२१ दिवस पहिला -


दि. २४ डिसेंबर २०२१ दिवस दुसरा -


प्रशिक्षण कोण घेऊ शकेल ?


राज्यातील पहिल्या टप्प्यात ४०,००० शिक्षकांनी सदरचे प्रशिक्षण पूर्ण केले असून , या टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ८०,०६९ शिक्षकांनी या प्रशिक्षणासाठी आपली नाव नोंदणी केलेली आहे. या सर्व नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आयडी SCERT पुणे यांच्या मार्फत SMS द्वारे तसेच संबंधित जिल्ह्याच्या PDF च्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. याचा वापर करून सदरचे प्रशिक्षणामधे देण्यात येणारे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थी यांनी करावयाचे आहे. यासाठी  G suit आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे. नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीयांना सदरचे प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे.

ऑनलाईन गुगल क्लासरुम प्रशिक्षण २०२१-२२ साठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे G-suit आयडी जिल्हानिहाय पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.


सर्व प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा

Post a Comment (0)
Previous Post Next Post