राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी 2021 | NAS Exam 2021

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी 2021 | NAS Exam 2021


भारत सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग (शिक्षण मंत्रालय) व CBSE आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या मार्फत संपूर्ण देशभरात एकाच दिवशी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी 2021 म्हणजेच NAS Exam 2021 दिनांक 12 नोव्हेंबर 2021 होणार आहे. NAS Exam कोणासाठी आहे? या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश नक्की काय आहे? यामध्ये कोणत्या इयत्तांचा समावेश आहे? NAS Exam सर्वेक्षणाची कार्यपद्धती व इतर सविस्तर माहिती पाहूया.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण म्हणजे काय ? What is National achievement survey? 

NAS Full Form - National achievement survey

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी म्हणजे ही एक राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांची Learning Outcomes संदर्भात विद्यार्थ्याची प्रगती समजून घेणे तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील अडथळे दूर करणे , शिक्षक प्रशिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी भारत सरकार शिक्षण मंत्रालय , CBSE बोर्ड , NCERT व SCERT यांच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा म्हणजे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी NAS Exam चे आयोजन करण्यात येते. यंदा 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे. 

NAS 2021 - महत्वपूर्ण बाबी

 • वर्ग 3, 5, 8 आणि 10 च्या शेवटी विद्यार्थ्यांना काय माहित आहे आणि काय करू शकते हे जाणून घेणे. म्हणजे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी मधून Learning Outcomes संदर्भात विद्यार्थ्याची प्रगती समजून घेण्यास मदत होणार आहे.
 • शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन, अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया आणि Learning Outcomes संपादणूक समजून घेण्यासाठी संशोधक यासह शैक्षणिक नियोजक आणि धोरण निर्मात्यांसाठी NAS उपयुक्त ठरेल.
 •  NAS 2021 विद्यार्थ्यांच्या त्यांच्या सामाजिक-भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाच्या दृष्टीने दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे होणाऱ्या परिणामांचा पद्धतशीर अभ्यास करण्यास मदत करेल.
 • चाचणी अहवालाच्या अहवाल मदतीने शिक्षक, पर्यवेक्षीय अधिकारी, DIETs, SCERT आणि इतर अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे.
 • हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या संदर्भात भविष्यातील प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करेल

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी उद्देश 

राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तराची माहिती घेणे कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तर किती प्रमाणात कमी जास्त आहे हे ठरविणे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीसाठी शाळा निवड 

शाळा निवडताना NCERT कडून S , R1 आणि R2 या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
S (selected), R1 (reserve 1) आणि R2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार ह्या सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले असतील. 
 • निवडलेल्या शाळांची यादी व निवडलेले वर्ग NAS  SCERT  पुणे कडून जिल्हा निहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
 • या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी चाचणी होणार आहे.
 • चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत सर्व्हेक्षणमध्ये निवडण्यात आलेल्या शाळेमध्येच घेण्यात येणार आहे.

चाचणीचे स्वरूप 

objective/MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.

 • इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे (वेळ 60 मिनीट)
 • इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र  (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
 • चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न  इयत्तानिहाय अभ्यासक्रमातील क्षमतावर आधारित असणार आहेत.
 • चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.
 • निवडलेल्या वर्गाची पटसंख्या 30 किंवा 30 पेक्षा कमी असेल तर संपूर्ण 100% विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे आणि जर वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असेल तर फक्त 30 च विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
 • चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा/काळा बोलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे.
 • निवडलेल्या वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्र. शाळेने आपल्या दप्तरी ठेवावे व चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यावेत.
 • उत्तरपत्रिकांचे हे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर जाणार आहेत.
 • या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुकानिहाय निकाल वेबसाइटवर NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 • यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील/जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल. 

उत्तरपत्रिका कोण तपासणार?

प्रत्येक उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाणार आहे. यासाठी राज्यावर स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. पर्यवेक्षक चाचणी संपल्यावर पर्यवेक्षक सर्व उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका सीलबंद पॅकेट मध्ये घालून पुढील यंत्रनेकडे पाठवतील.

चाचणीचा निकाल प्रत्येक राज्यातील जिल्हानिहाय अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण संदर्भात निर्गमित झालेल्या परिपत्रकांच्या आधारे वरील माहिती ही  संकलित केलेली आहे या माहितीमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. 
तेव्हा अधिकृत माहितीसाठी https://nas.education.gov.in/home या संकेतस्थळास भेट द्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post