SCERT SWADHYAY उपक्रम माहिती आठवडा 14 वा सुरू

SCERT SWADHYAY उपक्रम माहिती आठवडा 14 वा सुरू 



शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला शालेय शिक्षण विभाग राज्य शासनाने सुरू केलेला उपक्रम म्हणजे  SCERT SWADHYAY (Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana)
सदरचा स्वाध्याय उपक्रम इ 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपक्रमामध्ये नोंदणी करून सहभागी होता येते. दर आठवड्याला इयत्ता व विषयनिहाय सराव Whatsapp च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने करता येतो. विशेष म्हणजे चुकलेल्या प्रश्नांसाठी दिक्षा App वरील व्हिडीओ लिंक उपलब्ध होतात. यावरून विद्यार्थी व्हिडीओ पाहून आपल्या संकल्पना अधिक दृढ करून घेण्यास याची मदत होत आहे. आता पर्यंत राज्यभरातुन जवळपास 90 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी SCERT SWADHYAY उपक्रमात नोंदणी केलेली आहे. (More than 90 lakh students have registered on swadhyay) 

स्वाध्याय उपक्रमाचा चालू शैक्षणिक वर्षातील हा भाग 2 सूरु असून स्वाध्याय उपक्रम आठवडा 14 वा सुरू झालेला आहे. मागील 13 व्या आठवड्यात 24 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी स्वाध्याय वर सहभागी झाले आहेत.


SCERT SWADHYAY आठवडा 13 मधील Top 3 जिल्हे


SCERT SWADHYAY आठवडा 13 मध्ये राज्यभरातून Top 3 मध्ये सातारा, अहमदनगर , सांगली हे जिल्हे आघाडीवर आहे. विभाग निहाय स्वाध्याय उपक्रमात कोकण मधून रायगड , पुणे विभागातून सातारा , नाशिक मधून अहमदनगर , औरंगाबाद विभागातून नांदेड तसेच नागपूर मधून चंद्रपूर आणि अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा आघाडीवर आहे. 

SCERT स्वाध्याय उपक्रम आठवडा 14 वा सुरू


स्वाध्याय उपक्रमातील भाग 2 मधील 14 व्या आठवड्यात मराठी आणि उर्दू माध्यमातून भाषा विषयावरील प्रश्नांचा सराव करता येणार आहे. यासाठी विभाग निहाय आपल्या जिल्ह्याच्या लिंक वरून आपण स्वाध्याय उपक्रमात सहभागी होऊ शकता. यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लीक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post