कोजागिरी पौर्णिमा | Kojagiri purnima in marathi

कोजागिरी पौर्णिमा | Kojagiri purnima in marathi

सर्वसाधारणपणे कोजागिरी पौर्णिमा ही इंग्रजी महिन्याप्रमाने ऑक्टोबर महिन्यामध्ये येते. तसेच मराठी महिन्याचा विचार केला असता "कोजागिरी पौर्णिमा" शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. या पौर्णिमेला "आश्‍विन पौर्णिमा" असेही म्हणतात तसेच  "कौमुदी पौर्णिमा" असे ही म्हणतात.या वेळी थंडी ची सुरुवात झालेली असते. आकाशात चंद्राचा प्रकार प्रकाश आणि पूर्ण चंद्रबिंब असल्याने सगळीकडे दुधासारखे चांदणे पसरलेली असते.

पौर्णिमा म्हणजे काय?

आपण भारतीय कालनिर्णय मध्ये अमावस्या, पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी,चंद्रग्रहण ,सूर्यग्रहण  या सारख्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. त्यातील पोर्णिमा म्हणजे ज्या दिवशी आकाशात पूर्ण चंद्रबिंब असते त्याला "पौर्णिमा" असे म्हणतात तसेच purnima ला "पूर्णमाशी" असे म्हणतात. पौर्णिमा हा एक क्षण असून त्या वेळी चंद्र व सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असतात व त्यांच्यातील पृथ्वीवरून मोजलेले अंतर 180 अंश सेल्सिअस असते म्हणजे ते प्रतिनिधी प्रतियूती मध्ये असतात. पोर्णिमा एक महिन्याने येत असते. जय दिवशी आकाशात पुर्ण चंद्र झालेला असेल त्यादिवशी आपण समजून जायचे की आज पौर्णिमा आहे.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय ? 

कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच सर्वसाधारणपणे ही पौर्णिमा ऑक्टोबर महिन्यात येथे मराठी महिन्याचा विचार करता आश्विन पौर्णिमेला "कोजागिरी पौर्णिमा" Kojagiri purnima असे म्हणतात . तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही पूर्णिमा शरद ऋतूमध्ये हिवाळ्यात येते .  या दिवशी दुर्गादेवी कोण कोण जागे आहे, असे विचारत सर्वत्र पृथ्वीतलावर फिरत असते ,अशी आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी सर्वत्र रात्रभर जागून दुध चंद्राच्या प्रकाशामध्ये तापवून त्यामध्ये सुकामेवा टाकुन सर्व लहान-थोर हे दूध प्राशन करतात.हे दूध पिल्याने अनेक आजारांवर आराम मिळतो असे सांगितले जाते.

कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात?

या दिवशी बरेच लोक उपवास करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळ्या देवींना जाऊन त्यांची मनोभावे पूजा केली जाते.रात्री लक्ष्मी आणि ऐरावतारूढ यांची पूजा केली जाते.त्यानंतर रात्रभर जागून गावातील ,वेगवेगळे लोक  दूध एकत्र करून गच्चीवर अथवा अंगणात दुधाला तापवले जाते.दुधात काजू ,बदाम सुका मेवा घालून उकळून आटवले जाते.सर्व दूध सर्वांना वाटून प्यायला दिले जाते.हे दूध प्यायल्याने अनेक आजार कमी होतात.असे सांगितले जाते.या दुधाने शरीराला उष्णता मिळते.अशा प्रकारे "कोजागिरी पौर्णिमा" साजरी करतात. 

कोजागिरी पौर्णिमा विषयी कथा 

कोजागिरी पौर्णिमे विषयी अनेक कथा आहेत.या ठिकाणी एका कथा अशीही सांगितली जाते की प्राचीन काळात एक मगध देशात वलीत नावाचा एक सुसंस्कारी असणारा पण दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा संचारी होता, त्याची पत्नी तेवढीच वाईट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असत. एवढेच नव्हे तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे.

एकदा शरद श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी ब्राह्मण नाराज होऊन जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे एक नागकन्या भेटली. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. तिने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे कोजागरी व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधी नुसार पूजा करून कोजागरी व्रत केले. रात्री देवी लक्ष्मी ने येऊन ब्राम्हणाला दरिद्री तून मुक्त केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला खूप मोठी धनसंपत्ती प्राप्त झाली. भागवती महालक्ष्मीच्या कृपेने त्या ब्राम्हणाच्या पत्नीची ही बुद्धी ठिकाणावर आली तिला आपली चूक कळली आणि ते दांपत्य सुखाने संसार करू लागले.

Post a Comment (0)
Previous Post Next Post