गणेशोत्सव निबंध मराठी | Ganeshotsav Nibandh Marathi

 

Ganeshotsav Nibandh Marathi

गणेशोत्सव निबंध मराठी | Ganeshotsav Nibandh Marathi

गणेश जयंती महत्व | Ganesh Jyanti

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

'गणेशोत्सव' सर्वांचा आवडता सण, उत्सव म्हणजे 'गणेशोत्सव' कोणत्याही देवतेची पूजा करण्याअगोदर सर्वप्रथम आपण गणेशाची म्हणजेच गणपतीची प्रथमता पूजा करतो. त्यानंतर इतर देवतांची पूजा करत असतो. 'गणेशोत्सव' हा संपूर्ण भारताबरोबर इतर राष्ट्रांमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये 'गणेशोत्सव' साजरा केला जातो. विशेषत: कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे 'गणेशोत्सव' हा सण होय.

गणेश म्हणजे काय हे जाणून घेऊया 'ग' म्हणजे 'ज्ञान देणारा' आणि ‘ण’ म्हणजे 'मोक्ष प्राप्ती करून देणारा' ज्ञान आणि मोक्षप्राप्ती करून देणारा ईश्वर किंवा स्वामी म्हणून गणेश हे त्यांचे नाव आहे. 

गणेशत्सवाची सुरुवात ही हरतालतिका पासून होते म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेपासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची सुरुवात होत असते. शिवशंकरच मला पति या रूपाने लाभावा. याकरिता गणेशाची आई म्हणजे पार्वती माता यांनी एक व्रत केले आणि बारा वर्ष सतत कंदमुळे आणि फळे खाऊन त्यांनी आपल्या सखी बरोबर पर्वतावर शिवलिंगाची स्थापना केली. आणि शिवशंकर पती म्हणून लाभावे, म्हणून खूप कठीण अशी आराधना केली. 

तिच्या या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकरानी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. हाच दिवस म्हणजे हरतालतिका, खऱ्या अर्थाने येथून गणेशोत्सवाची सुरुवात होते. त्याच्या नंतरचा जो दिवस आहे, तो आहे. 'भाद्रपद शुद्ध चतुर्थी' या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्यांना पुन्हा जिवंत केले. तो दिवस म्हणजे 'गणेश चतुर्थी' आहे. म्हणून 'गणेशोत्सव' हा गणेशाचा जन्म दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

गणेशोत्सव | Ganeshotsav

'गणेशोत्सव' हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय उत्सव आहे. हिंदू धर्मीयांचा Ganeshotsav हा आवडता सण आहे. गणरायाचे आगमन 'भाद्रपद शुध्द चतुर्थीस' होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने 'गणेशोत्सव' साजरा करण्यात येतो. 
लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेला हा Ganeshotsav भारत देशात व देशाबाहेरही कोणतीही जात पंथ धर्म न मानता साजरा केला जातो. १८३२ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. 

सर्व लोकांनी एकत्र यावे, एकजुटीने एक सण साजरा करावा. सर्वधर्मसमभावाची भावना प्रत्येकामध्ये जागृत व्हावी आणि एकत्रितरीत्या काहीतरी मोठं काम त्यांच्या हातून घडावं म्हणून गणेश उत्सवाची सुरूवात करण्यात आली आहे. 
भारतीय समाजामध्ये एकात्मता असावी ह्या उद्देशाने टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे हाही उद्देश होता.

अतिशय वाजत-गाजत या गणरायाला मिरवणुकीच्या द्वारे घरी आणलं जातं. घरातील लहान थोर अगदी उत्साहाने ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला घरी आणतात. त्यांना औक्षण करून त्यांचं स्वागत केलं जातं.  

कोकणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विविध प्रकारची आरास, मोदक यांची रेलचेल असते. काही पौराणिक देखावे,  ऐतिहासिक देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जातात. सामाजिक प्रश्नांवर विविध ठिकाणी देखावे जे आहेत ते या दिवसात उभारले जातात. त्या अनुषंगाने कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. 

आजही ही प्रथा चालू ठेवणारी काही गणेशोत्सव मंडळे आहेत. परंतु त्यामध्ये वाढ व्हावी वकृत्व स्पर्धा, गायन, क्रीडा स्पर्धा, लेखक साहित्यिक, कवी, नाटककार यांच्या भाषणांचे कलागुणांचे मार्गदर्शन अशी कार्यक्रम या काळात साजरे व्हावेत, यातून नवीन पिढीला नक्कीच योग्य दिशा मिळेल.

गणेशाला दूर्वा, जास्वंदीची फुले अर्पण करतात. तसेच मोदक, खीर, लाडू इ. पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून आरती करतात.  

गणपती हे हिंदु धर्मांतील आराध्यदैवत आहे. कोणत्याही देवतेच्या पूजेच्या आधी गणपतीचे पूजन केलं जातं. गणपतीला लंबोदर म्हटलं जातं. म्हणजे आपल्या भक्तांच्या सगळ्या चुका पोटात घेणारा हा देव आहे. 

गणपतीचे कान खूप मोठे आहेत. म्हणजे तुम्ही खूप ऐका, पण त्याच बरोबर गणपतीचे तोंड हे खूप छोटे आहे. म्हणजे खूप ऐका आणि कमी बोला हा संदेश गणपती बाप्पा आपल्याला यानिमित्ताने देत असतात. गणपतीच्या हातामध्ये गोड मोदक असतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त गोड गोष्टीच्या गोड आठवणी आहेत. त्या लक्षात ठेवा आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जा. याच्या मागचे शिकवण गणपती बाप्पा आपल्याला देत असतात. 
गणरायाचे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ किंवा दहा दिवस वास्तव्य असते. अनंत चतुर्दशीला 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन होते. अशा प्रकारे 'गणेशोत्सव' साजरा केला जातो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post