गौरी पूजन माहिती मराठी | Gauri Pujan Mahiti Marathi

 

gauri pujan mahiti marathi

गौरी पूजन माहिती मराठी | Gauri Pujan Mahiti Marathi

हिंदू धर्मशास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरी गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्यांना अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला, व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासूनच सर्व स्त्रिया महालक्ष्मी 'गौरी पूजन' पूजा करू लागल्या.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचालाप्रमाणे आपण महालक्ष्मीची पूजा करतो. महालक्ष्मीची स्थापना आपल्या घरात करतो. Gauri Pujan हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्याला एक महत्त्वाचे व्रत आहे.

महाराष्ट्रात हे व्रत म्हणून आपण साजरा करतो. त्यालाच 'Mahalakshmi Pujan' किंवा 'गौरी पूजन' असंही म्हटलं जातं. गौरीच्या मांडणीच्या विविध पद्धती महाराष्ट्रात दिसून येतात. अनेक रूपांमध्ये गौरी आणि महालक्ष्मी आपल्याकडे येत असतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचकात जी शुभ वेळ असेल, ती वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी किंवा Mahalakshmi आपल्या सखीसह किंवा पार्वतीसह त्यांची मुलं सुद्धा काही जण मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात. तर कोणी मातीची प्रतिमा बनवतात तर काहीजण कागदावरती या देवीचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते.

पहिल्या दिवसाला 'गौरी आवाहन' असं म्हणतात. आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना त्या महिलेच्या हातात गौरी असतील त्या महिलेचे पाय पाण्याने धुऊन घेतात. आणि त्यावर ती कुंकवाच स्वस्तिक काढतात. धान्याचा माप ओलांडून या गौरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. घराचा दरवाजा पासून ते जिथे गौरी बसवायच्या असतील त्या जागेपर्यंत लक्ष्मी च्या पायाचे ठसे उमटवत-उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात. त्यावेळी घंटानाद केला जातो. 

काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर ती मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवलं जातं. या स्वर्गातून आपल्याकडे आलेले आहेत. आणि आपल्या भावाकडे म्हणजे गणरायाकडे त्या तीन दिवस माहेरवाशीण म्हणून आलेल्या आहेत, अशी प्रथा प्रचलित आहे. 

महालक्ष्मीचे मुखवटे, काही ठिकाणी शाडू मातीचे तर काही ठिकाणी पितळांचे, कापडांचे तर काही ठिकाणी फायबरचे असे विविध प्रकारचे मुखवटे हे पहायला मिळतात. ज्या दिवशी गौरी आणायचे असतात त्या दिवशी संपूर्ण घर हे खूप सुंदर रित्या सजविले जाते. हार, तोरणे बांधली जातात. ज्या ठिकाणी त्यांना स्थानपन्न करायची असते. ती जागा विविध प्रकारे तिची सजावट केली जाते. संपूर्ण घरांमध्ये एक आनंद उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं.  पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. 

दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते. सकाळी गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती करून जो काही फराळ बनवला जातो. रव्याचा लाडू, बेसनाचे लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचे लाडू,  गौरींना नैवेद्य म्हणून दाखवतात. दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये महालक्ष्मीची पूजन केले जाते. किंवा महाप्रसाद केला जातो. या दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ गौरींसाठी केले जातात. 

सोळा भाज्या, कोशिंबिरी, खीर, आमटी असा विविध प्रकारे पंचपक्वानांचा नैवेद्य गौरींना दाखवण्यात येतो. माहेरवाशिन असल्यामुळे तिला लाडू, करंज्या, चकली असे वेगवेगळ्या प्रकारचे फराळ, फळे यांचा नैवेद्य संध्याकाळी दाखवण्यात येतो. आणि संध्याकाळी त्याची आरती केली जाते. शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगळ्या प्रकारची लोणची पापड इत्यादी अनेक पदार्थ नैवेद्य मध्ये समाविष्ट असतात. ते सगळेच्या सगळे पदार्थ केळीच्या पानावर ठेवली जातात. 

महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी या सायंकाळी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सोहळा आयोजित केला जातो. आणि ज्या महिला आणि मुली दर्शनासाठी येतील  या गौरी च्या दर्शनासाठी महालक्ष्मी पाहण्यासाठी येतील त्या महिलांनी मुलींचा आदरपूर्वक स्वागत केले जाते. शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांना हळदीकुंकवासाठी आणि गौरीच्या दर्शनासाठी बोलण्यात येते. अशा प्रकारे दुसरा दिवस संपन्न होतो.

तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो. या दिवशी या गौरी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते. हा तिसरा दिवस म्हणजे मूळ नक्षत्र, मूळ नक्षत्रावर गौरीचे आणि महालक्ष्मीचे विसर्जन करतात. सुताच्या गाठी पाडतात त्यामध्ये हळदीकुंकू, बेलफळ, झेंडूचे पान,फुले , रेशमी धागा या महत्त्वाच्या वस्तू मांडल्या जातात. आणि मग नंतर या गौरीची किंवा महालक्ष्मीची पूजा होते. आरती होते. गोड शेवया ची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवतात. 

एखादी माहेरवाशीण जेव्हा घरी येते, तो क्षण म्हणजे आनंदाचा एक परमोच्च क्षण असतो. तिसऱ्या दिवशी दहीभाताचा आणि कानुल्याचा नैवेद्य दाखवून गौरींना विसर्जित करण्यात येते. काही ठिकाणी गणपतीचे विसर्जन हे गौरी बरोबर होतं तर काही ठिकाणी गणपती हे पुढचे दहा दिवस हे आपल्या बरोबर असतात. गौरी आणि गणपती यांचे नातं हे बहीण-भावाचे प्रतीक म्हणून मानलं जातं. जस गणपतीच्या घरांमध्ये गौरीचे आगमन होऊन ते बहीण-भावांचे नात आहे ते दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही आपल्या बहिणीचं अशाच प्रकारे आगत-स्वागत करावे, ही यामागची शिकवण आहे.

बऱ्याचदा गौरी आणि रिद्धी सिद्धी यांच्यामध्ये लोक गफलत करतात. गौरी गणपतीच्या बहिणी आणि रिद्धी सिद्धी या गणपतीच्या बायका. गणपती बाप्पांच्या लग्नाच्या मागे पण एक मजेशीर गोष्ट आहे. गणपती बाप्पा त्यांचा चेहरा हा मोठा हत्तीसारखा असल्यामुळे त्यांच्याशी लग्न करायला कोणी तयार नव्हत. त्यामुळे ते इतर देवतांचे लग्न सुद्धा होण्यासाठी विघ्न आणायचे आणि ह्या कार्यामध्ये त्यांचे वाहन त्यांना मदत करत असे. कोणाही देवाचं लग्न असेल तर तिथला जो मंडप आहे. तो कुरतडून टाकायचा. त्यामुळे सगळे देवता खूप परेशान झाले, आणि ते ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा म्हणून विनवले. 

ब्रह्मदेवाने योगाद्वारे रिद्धी आणि सिद्धी या दोन कन्यांची निर्मिती केली आणि त्या दोघींना घेऊन ते गणपतीकडे आले. आणि ह्या दोघींना तुम्ही शिक्षित करा म्हणून त्यांनी गणपतीला सांगितले, त्यानंतर कोणत्याही देवतेची लग्नपत्रिका आली की, या दोघी जणी काहीतरी नाटक करायच्या आणि गणपतीचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचा. गणपतीबाप्पांना ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर ब्रम्हादेव तिथे आपल्या दोघी ही कन्या रिद्धी आणि सिद्धी यांना घेऊन आले, आणि मोठ्या धुमधडाक्यात मध्ये गणपती बाप्पांचा विवाह या दोघी कन्या बरोबर झाला अशा प्रकारे ही गणपती यांच्या लग्नाची कथा आहे.

तिसऱ्या दिवशी गौरीचे किंवा महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी नक्की येण्याचं आमंत्रण या महालक्ष्मी गौरीना दिल जात. आणि मग त्यांचे विसर्जन होतं. गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर पुन्हा घराकडे परत येताना थोडीशी वाळू घेऊन पुन्हा घरात येण्याची आणण्याची पद्धत आहे. आणि ही आणलेली बाळू घरात सर्वत्र तसेच परसबागेतील झाडांवर झुडपांवर ती टाकली जाते. असं म्हणतात की, असं केल्याने घरामध्ये समृद्धी येते. वैभव येतं आणि झाडाझुडपांचा वृक्षांचं कीटकांपासून संरक्षण होतं.

Post a Comment (0)
Previous Post Next Post