SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ | scert swadhyay upkram 2021

नविन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरु झालेले आहे.  चालू शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यासाठी शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. नुकतेच १ जुलै पासून सेतू अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षाचा अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम १ जुलै ते  14 ऑगस्ट पर्यंत घेतला जाणार आहे. 

scert swadhyay


यामध्ये आता नव्याने SCERT Whats App स्वाध्याय उपक्रमास १७ जुलै पासून सुरुवात झाली आहे. यावेळी SCERT स्वाध्याय  उपक्रमा काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. कोणता बदल झाला आहे?  स्वाध्याय उपक्रम कशा पद्धतीने सोडवायचा आहे?  याविषयीची माहिती पाहूया.

> SCERT स्वाध्याय उपक्रम लिंक 

SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ | SWADHYAY - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana 

SCERT स्वाध्याय २०२१-२२ महत्वाची माहिती

  • SCERT स्वाध्याय उपक्रमासाठी सहा विभागानुसार वेगळा Whatsapp No आहे. विभागानुसार Whatsapp No व लिंक खाली दिलेली आहे. आपल्या जिल्ह्या व विभागानुसार लिंक वर क्लिक करा.
  • इयत्ता १ ली ते १० वी साठी SCERT स्वाध्याय असणार आहे.
  • दर शनिवारी नविन SCERT स्वाध्याय अपडेट होईल. 
  • मुलांना प्रश्न सोडवण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मिळणार आहे. 
  • सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे.
  • शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे  स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत. 
  • SCERT स्वाध्याय नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे.
  •  आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.
  • लिंक व नंबर खाली दिले आहे.

टीप- SCERT स्वाध्याय सुरु केल्यानंतर स्क्रीन वर दिसणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उत्तराचा क्रमांक/ नंबर लिहून सेंड करायचा आहे.{alertInfo}

स्वाध्याय उपक्रमात सहभाग होण्यासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करून अधिकाधिक सराव करावा.


> आपल्या जिल्हा व विभागाचा नंबर नुसार मोबाईल मध्ये  SCERT Swadhyay या नावाने नंबर save करा.
> सेव्ह केलेल्या नंबरवर hello किंवा नमस्ते/ Namaskar असा मेसेज टाईप करा. किंवा खाली टेबल मधील लिंक वर क्लिक करून hello किंवा नमस्ते/ Namaskar असा मेसेज टाईप करा.
> त्यांनतर आपल्याला auto chat पद्धतीने मेसेज येईल. त्याची उत्तरे द्यावी. उत्तरे देताना उत्तराचा नंबर सेंड करावा.
> उदा. आपले माध्यम निवडा, विद्यार्थी पूर्ण नाव , शाळेचा यु डायस कोड , इयत्ता याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देवून स्वाध्याय सुरु करता येईल.


नवीन विद्यार्थ्यांसाठी :- वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.{alertInfo}

पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी:- वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.{alertInfo}

 

> विभाग , जिल्हा निहाय आपल्या जिल्ह्यातील  नंबर व लिंकPost a Comment

Previous Post Next Post