Parsi Festivals 2021 | कसा साजरा केला जातो पतेती सण?
पतेती सण
पतेती हा पारशी धर्मीयांचा महत्वाचा सण म्हणून ओळखला जाते. पतेती हा सण धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय लोक मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात.
ज्या प्रकारे हिंदू,मुस्लिम बांधव आपले सण उत्साहाने साजरे करतात, त्याच प्रमाणे पतेती हा पारशी बांधवांचा सण आहे. हा पारश्यांचा नववर्ष दिवस आहे.
नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. पारशी लोक पतेतीच्या दिवशी वर्षभरात झालेल्या चुकांची आणि गुन्ह्यांची कबुली देऊन पश्चातापाचा दिवस म्हणून साजरा करतात.
>> "राष्ट्रगीत गाणे" आपला व्हिडिओ सिलेक्ट झाला का? टॉप 100 व्हिडिओ
>> फक्त बोला टाईपिंग आपोआप होईल गूगल मराठी टाइपिंग
नवरोझ (Nowroz) पारशी समुदायचे नववर्ष
इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला ‘नवरोज’ म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे.
ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.
या दिवशी पारशी लोक धार्मिकस्थळांना भेट देऊन प्रार्थना करतात. एकमेकांना गळाभेटी देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतात.
नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींना भेटतात. या उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करण्याची देखील पारशी समाजात परंपरा आहे.
महात्मा गांधी पारशी बांधवां विषयी म्हणाले होते की, हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे.
खरोखरच स्वातंत्र सैनिकां पासून ते उद्योजकां पर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केलेले दिसून आहे.